नवीन सूचना

सुस्वागतम्

मित्र हो, सप्रेम नमस्कार

ही आजच्या शिक्षणाची महत्वाची उदिदष्टये आहेत. मित्रहो, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आपण सर्वजण कटिबध्द आहोत. दक्षिण मुंबई विभागातील शाळांना प्रदिर्घ असा शैक्षणिक व ऐतिहासिक वारसा आहेत. जवळपास सर्वच शाळांची स्थापना ही स्वातंत्र्याच्या अगोदरची आहेत. राज्याच्या राजधानीमध्ये, देशाच्या आर्थिक राजधानी मध्ये काम असतांना इतरांना ते निश्चितच प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल या दिशेने आपली वाटचाल असली पाहीजे. ऑलविन टॉफलर या अमेरिकन विचारवंताने आपल्या Future shock या पुस्तकामध्ये तीन लाटांचा उल्लेख केला आहे. पहिली लाट कृषीक्षेत्रातील, दुसरी औदयोगिक क्षेत्रातिल व तिसरी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या या लाटेवर आपण आरुढ होवू या । www चा अर्थ विनोदाने world without wall असा घेतला जातो. सा-या भौगोलिक सीमा लंघून जग विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधारावर बिनभिंतीच झालं आहे. दक्षिण मुंबईतील सर्व शाळा, मुख्याध्यापक व शिक्षक बांधवांचे मी या संकेतस्थळावर मन:पूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांना चांगल्या कार्यासाठी शुभेच्छा ।

Devidas Mahajan

Education Inspector

Gr.Mumbai South Zone

Mobile No.📲. 8788762390/9850753306

about img 1 about img 1